कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना पूर्ण, संपावर ठाम

कधी थांबेल आंदोलन, ऐका त्यांच्याच तोंडून

गडचिरोली : राज्य शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी राज्यभरात संपावर असणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. गडचिरोलीत जिल्हा परिषदेसमोर दररोज हे कर्मचारी मोठ्या संख्येने ठाण मांडून नारेबाजी करताना दिसतात.

जिल्ह्यात कोविडकाळासह नियमित आरोग्य सेवेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. पण अद्याप सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. जर शासन आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तर आम्ही त्यांचा विचार का करायचा, असा सवालही ते करत आहेत. त्यामुळे आम्ही संपावर ठाम आहोत, अशी भूमिका एनएचएमच्या जिल्हा कृती समितीचे समन्वयक अजिंक्य शेळके यांनी स्पष्ट केली.