कर्जासाठी अर्ध्याअधिक शेतकऱ्यांची मदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर

आतापर्यंत १७ हजार शेतकऱ्यांना ८६ कोटींचे कर्जवाटप

गडचिरोली : यावर्षी खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात ६५ हजार ९६ शेतकऱ्यांना ३०९ कोटी ९८ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २५ हजार १६९ शेतकऱ्यांना १४४ कोटींचा कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कर्जवाटपात ५० टक्केपेक्षा जास्त वाटा एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची मदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरच असल्याचे दिसून येते.