राणी दुर्गावती कन्या महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींना कौतुकाची थाप

संस्थाध्यक्ष मडावी यांच्याहस्ते सत्कार

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखणार्‍या येथील राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून संस्थाध्यक्ष घनश्याम मडावी यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

बारावीच्या परीक्षेत राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 80 टक्के लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेली चैतन्या वामन टिकले हिने 78.17 टक्के गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय वैष्णवी गुरूदास मोहुर्ले हिने 76.67 टक्के, तृतिय चंदा मोहुर्ले हिने 64.33 टक्के, किर्ती टिंगुसले हिने 63.83 टक्के, सोनाली गणपत गावतुरे हिने 63.33 टक्के गुण मिळवून कला शाखेतून राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

याबद्दल यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष आदिवासी सेवक घनश्याम मडावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी सरोज मडावी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मडावी, प्रा.प्रकाश सोनवाणे, प्रा.देवानंद कामडी, प्रा.संध्या येलेकर, पुरुषोत्तम ठाकरे, राजेश चुर्‍हे, निरज धोडरे, शिक्षिका सुनिता चुधरी, शिक्षिका सोनाली लटये, आनंदराव मांडवगडे, सतीश मडावी, धनराज ठेमस्कर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळाचे यथोचित मार्गदर्शन, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांचे व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींवर घेतलेली मेहनत, होणारे नियमित वर्ग, नियमित चाचण्या आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणामुळे हे यश प्राप्त करता आले, असे विद्यार्थिनींनी सांगितले.