देशातील अतिमागास जिल्ह्यांमध्ये मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात बारमाही वाहतुकीसाठी चांगले रस्ते नाहीत. कुठे रस्ते आहेत तर छोट्या नद्यांवर पूल नाहीत. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. कसे करतात लोक प्रवास? का होऊ शकले नाहीत रस्ते आणि पूल? यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.