या ‘हिरकणीं’ची कुचंबना थांबवा हो…

सार्वजनिक ठिकाणी आपल्या बाळाला दूध पाजताना महिलांची मोठी अडचण होते. बस स्थानकावर तर महिलांना अनेकांच्या नजरा चुकवाव्या लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने बस स्थानकांवर हिरकणी कक्ष तयार केले. कोणत्याही मातेला आपल्या बाळाला दूध पाजायचे असल्यास त्या कक्षात हक्काने जाऊन बसता येते. पण खरंच हे हिरकणी कक्ष कार्यरत आहेत का? पहा हा वृत्तांत.