आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला आ.कृष्णा गजबे यांची आकस्मिक भेट

रुग्णांशी संवाद साधत जाणल्या समस्या

आरमोरी : आमदार कृष्णा गजबे यांनी रविवारी अचानाक आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणच्या रुग्णांची भेट घेऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी भरती रुग्णांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.

यावेळी आ.गजबे यांनी मोठ्या आस्थेने रुग्णांची विचारपूस केली. यादरम्यान रुग्णांनी त्यांना जाणवत असलेल्या समस्या सांगितल्यानंतर आमदार गजबे यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी करून येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. रुग्णांनी त्यांच्याकडे मांडलेल्या समस्यांची माहिती डॅाक्टरांना देऊन तेथूनच जिल्हा शल्यचिकित्सकांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून रुग्णांची हेळसांड थांबवण्याची सूचना केली.

यावेळी भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, आरमोरीचे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरीचे माजी नगरसेवक भारत बावनथडे, भाजप शहर तालुका अध्यक्ष विलास पारधी, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अमोल खेडकर, मुकुल खेवले, थामेश्वर मैंद, सुरज कारकुरवार व आरमोरी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.