विश्रांतीनंतर मंत्री धर्मरावबाबा आत्राम सहा दिवसांसाठी गडचिरोलीत दाखल

3 दिवस गडचिरोलीत, तर 3 दिवस अहेरीत

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम पाच दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर दाखल झाले आहेत. रविवार, दि.2 ला त्यांचे गडचिरोलीतील सुयोग निवासस्थानी आगमन झाले.

लोकसभा निवडणुकीतील दगदगीनंतर त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना मुंबईतील डॅाक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर एक छोटी शस्रक्रियाही पार पडली. त्यानंतर पहिल्यांदाच ते गडचिरोलीत आले. दि.2 ते 4 जूनपर्यंत त्यांचा मुक्काम गडचिरोलीत राहणार असून दि.5 ते 7 जून दरम्यान ते अहेरीत उपलब्ध राहतील. त्यानंतर दि.8 ला सिरोंचामार्गे हैदराबादला रवाना होणार आहेत.