जिमलगट्टावासियांना मिळणार शुद्ध पाणी, जलशुद्धीकरण सयंत्र केंद्राची उभारणी

ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण

अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टा येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायततर्फे गावातच जलशुद्धीकरण सयंत्र केंद्र उभारण्यात आले. यासाठी मोठा निधी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उपलब्ध करून दिला होता. त्या जलशुद्धीकरण सयंत्र केंद्राचे काम पूर्ण होऊन धर्मरावबाबा यांच्याहस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सरपंच पंकज तलांडी, उपसरपंच व्यंकटेश मेडी, ग्रा.पं. सदस्य रुपाली तलांडी, किरण जुनघरे, रक्षिका पोरतेट तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन ना.आत्राम यांच्याकडे समस्या मांडल्यानंतर त्यांनी त्वरित निधी उपलब्ध करून दिला. अखेर जिमलगट्टावासियांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था झाली. याबद्दल येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.