गुरवळ्याच्या नेचर सफारीत आता वाघांचेही दर्शन

पर्यटकांचा ओढा वाढला, चार बछड्यांसह वाघिणीच्या एंट्रीने वाढले आकर्षण

गडचिरोली : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठेतरी फिरायला गेल्याशिवाय सुट्या एंजॅाय केल्याचा आनंदच मिळत नाही. अनेक निसर्गप्रेमी लोक जंगल आणि जंगलातील प्राणी पाहण्याच्या ईच्छेने गडचिरोलीत पाहुणे म्हणून येतात. गेल्या दिड वर्षापासून ताडोबाप्रमाणे निवांतपणे वाहनात बसून जंगलात फेरफटका मारण्याची सुविधा गडचिरोलीतही निर्माण झाली आहे. गडचिरोलीजवळच्या गुरवळा येथे ही सुविधा वनविभागाने उपलब्ध करून दिल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. आतातर गुरवळ्याच्या वनक्षेत्रात चार बछड्यांसह एका वाघिणीचे आगमन झाले आहे. त्यामुळे येथील जंगल सफारीचे आकर्षण आणखीच वाढले आहे.