महाराष्ट्राच्या बॅाल बॅडमिंटन संघात या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले स्थान

गडचिरोलीतील कोणत्या दोन शाळांचे आहेत?

गडचिरोली : राष्ट्रीय सब ज्युनियर बॅाल बॅडमिंटन स्पर्धा येत्या १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान छत्तीसगडमधील भिलाई येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुले व मुलींचे संघ घोषित करण्यात आले. त्यात गडचिरोलीच्या दोन शाळांच्या दोन विद्यार्थ्यांनी मुले व मुलींच्या राज्याच्या संघात स्थान मिळवले असून ते भिलाई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

वाणी धंदरे (प्रज्ञासंस्कार कॅान्व्हेंट) आणि अंशुमन आक्केवार (गोंडवाना सैनिकी विद्यालय) अशी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान देसाईगंज येथे बॅाल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने ४२ व्या सब ज्युनियर बॅाल बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात वरील दोन्ही विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा संघातर्फे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

या विद्यार्थ्यांनी आपल्या निवडीचे श्रेय बॅाल बॅडमिंटन संघटनेचे आश्रयदाते ना.धर्मरावबाबा आत्राम, आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी, भाग्यश्री आत्राम, प्राचार्य डॅा.राजाभाऊ मुनघाटे, प्रज्ञा संस्कारचे मुख्याध्यापक चेतन गोरे, गोंडवानाचे मुख्याध्यापक संजय गोसावी, बॅाल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, प्रा.रूपाली पापडकर, प्रशिक्षक आशिष निजाम, कपिल बागडे यांना दिले.