चामोर्शीत स्वरूप संप्रदायातर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात १२२ जण सरसावले

नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांचा उपक्रम

चामोर्शी : स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वरूप संप्रदायातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी १० फेब्रुवारी रोजी येथील नगर पंचायतमधील सांस्कृतिक भवनात सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिर पार पडले. यात १२२ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराला आमदार डॅा.देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, वैद्यकिय अधीक्षक डॉ.बिधान देवरी, महिला व बालकल्याण सभापती गीता सोरते, नगरसेविका वर्षा भिवापुरे, भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, जयराम चलाख, संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक मेघराज निबुध्दे, जिल्हाध्यक्ष दिवाकर मुके, सचिव प्रकाश कुनघाडकर, जिल्हा सल्लागार रामभाऊ सातपुते, तालुकाध्यक्ष अशोक वासेकर, प्रा.डॉ.राजेंद्र झाडे, सुरेश चिचघरे, लोमेश भांडेकर, महेश शेट्टे, विजय खरवडे, कार्तिक वासेकर, प्रमोद दुधबळे, मोरेश्वर कोठारे, बंडू नैताम , रमेश नैताम, रविंद्र आक्केवार, गजानन देवतळे, प्रशांत शेंडे, अनिल आईचवार, गणेश सुरजागडे उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संक्रमण टिमचे डॉ.श्रीतमा मुखर्जी, डॉ.शिल्पा गभने, नागेश मादेशी, सतीश तडकलवार, निलेश सोनवने, राहुल सिडाम, साक्षी झिले, जीवन गेडाम, हरिष टेकाम, बंडू कुंभारे यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.

संकलित रक्तपिशव्या महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढयांना देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित करण्यात आले. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. श्री संप्रदाय सेवा समिती तालुका चामोर्शीच्या सर्व गुरुबंधू भगिनींनी यासाठी परिश्रम घेतले.