रिमझिम पावसात ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे वैरागडमध्ये जल्लोषात स्वागत

सोमनानी परिवाराचे आयोजन, पहा व्हिडीओ

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून वैरागडमध्ये प्रथम आगमनानिमित्त त्यांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला. भर पावसात आदिवासी नृत्यासोबत त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर फुलांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. यावेळी वैरागडवासियांच्या उत्साहाला उधान आले होते.

भोलू सोमनानी मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोरील पटांगणात या जाहीर सत्काराचे आयोजन केले होते. धर्मरावबाबा यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होण्याआधी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यांचे वैरागडमध्ये आगमन झाले त्यावेळीही रिमझिम पाऊस सुरूच होता. पण धर्मरावबाबा यांचे आगमन होताच सोमनानी मित्र परिवारासह वैरागडवासियांच्या उत्साहाला पाऊसही रोखू शकला नाही. पाकळ्या उधळत आणि त्यांचे सत्कार मंडपात आगमन झाल्यानंतर भलामोठा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भोलू सोमनानी यांच्याकडे प्रतिष्ठापना झालेल्या श्रीगणेशाचे धर्मरावबाबा यांनी दर्शन घेतले.

यावेळी माजी आमदार हरिराम वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, भोलू सोमनानी, ग्रामपंचायत सदस्य शितल सोमनानी, गौरी सोमनानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, शिवसेना (उबाठा)चे जिल्हाध्यक्ष (अहेरी) रियाज शेख, माजी जि.प.सदस्य केशव गेडाम, माजी उपसभापती बबुजी ताडाम, तुळशिदास काशीकर, विनोद बावनकर, वैरागडच्या सरपंच संगिता पेंदाम, सुकाळाचे सरपंच अविनाश कन्नाके, मोहझरीचे सरपंच मयुर कोडाप, माजी सरपंच वैशाली डोंगरवार यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदकुमार मसराम व रामदास डोंगरवार उपस्थित होते.