डॅा.आंबेडकर जयंतीच्या उत्साहात न्हाऊन निघाला जिल्हा, ठिकठिकाणी शोभायात्रा

गडचिरोलीतील माहौलची व्हिडीओ झलक

गडचिरोली : जिल्ह्यात ठिकठिकाणी डॅा.बाबासाहेब आंबेडकरांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संध्याकाळी गडचिरोली शहरात बाबासाहेबांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय इंदिरा गांधी चौकात मोठा केक कापत आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. चौकात सुशोभित केलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या गर्दीने संपूर्ण चौक गर्दीने फुलून गेला होता.

शहरातील गोकुळनगर, फुले वॅार्ड, रामनगर, विवेकानंद नगर अशा विविध भागातून निघालेल्या मिरवणुका एकत्रित जमून रात्री इंदिरा गांधी चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यापूर्वीच चौकात सुशोभित केलेल्या स्टेजवर विराजमान बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सर्वजण नतमस्तक होऊन आपला फोटोही काढून घेत होते. दुसऱ्या बाजुला रेस्ट हाऊससमोरील रस्त्यालगत एका बाजुला महात्मा जोतिबा फुले आणि दुसऱ्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराज तर मध्ये डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुशोभित करून लावलेली होती. त्या ठिकाणीही गडचिरोलीकर फोटो काढून घेत होते. याशिवाय डीजेच्या तालावार थिरकत युवा वर्गाने आनंद साजरा केला.