विहिरगावात केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलनाचे उद्घाटन

संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवा- आ.गजबे

देसाईगंज : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा आणि आपल्यातील सुप्त कौशल्य विकसित करावे. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे, अशी अपेक्षा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केली.

पोटगाव केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगाव येथे करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटपर मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी विहीरगावच्या सरपंच भारती जुगनाके, पोटगावचे सरपंच विजय दडमल, विहीरगावचे उपसरपंच सारंगधर शंभरकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.