श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरातही स्वच्छता अभियान, भजन-पूजन, दिंडीसह केली सुरूवात

झांजांच्या गजरात खा.अशोक नेते यांचा सहभाग

चामोर्शी : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात मंदिर स्वच्छतेचे अभियान सुरू आहे. त्यात विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिरात खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात गुरूवार दि.१८ ला स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

भजन-पुजन, दिंडी आणि झांजांच्या गजरात, अतिशय भक्तीमय वातावरणात खासदार नेते यांनी स्वतः मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील स्वच्छता केली. हाती झाडू व पोचा घेऊन या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. यावेळी इतरही पदाधिकाऱ्यांना त्यांनी मंदिर स्वच्छता अभियानात सहभागी करून घेतले.

प्रथम मार्कंडेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर येताच भजन दिंडीसह खा.अशोक ‌‌नेते यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. तीर्थक्षेत्र मार्कंडेश्वर मंदिराच्या परिसरात विविध सोयीसुविधा निर्माण करून अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून संबंधितांकडे सतत पाठपुरावा चालू आहे. लवकरच मंदिर परिसरात इतर विकास कामांचे भूमिपूजन होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल वरघंटे, खासदारांची कन्या आशिता नेते, शहराध्यक्ष सोपान नैताम, शहर महामंत्री नरेश अल्लसावार, वासुदेव चिचघरे, आदिवासी आघाडीचे महामंत्री रेवनाथ कुसराम, जेष्ठ नेते माणिक कोहळे, मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सरपंच संगीता राजू मोगरे, उपसरपंच उमाकांत जुनघरे, पोलिस पाटील आरती आभारे, युवा शहर अध्यक्ष भाविक आभारे, जेष्ठ नेते भाऊ दहेलकर, सेवकराम बोरकुटे, दिवाकर कोहळे, विजय गेडाम, राजू धोडरे, श्रावण सोनटक्के, राजू चुधरी, अतुल गिरकुटवार, पुजारी पांडे महाराज, गुरव महाराज, मनोज हेबीज, राजू मोगरे, घनश्याम आभारे, भुजंग आभारे, नकटू तिवाडे, भैया आभारे, पांडुरंग आभारे, बाबुराव शेंडे, राजू शेंडे, तसेच गावातील नागरिक व भजन मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.