कोटगलपासून सायकल रॅली काढून युवकांनी सांगितले सायकलचे महत्त्व

नेहरू युवा केंद्र आणि शिवकल्याण संस्थेकडून विश्व सायकल दिवस साजरा

गडचिरोली : विश्व सायकल दिवसाचे औचित्य साधून ‘मिशन लाईफ’ अभियानाअंतर्गत नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टीपर्पज डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेच्या पुढाकारातून कोटगल ते आयटीआय चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात काढलेल्या या सायकल रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला.

या रॅलीत युवकांनी सायकलच्या महत्त्वांना उजागर केले. मानवाचे आयुष्य हे सायकलप्रमाणे आहे. पुढे जायचे असेल तर पायडल मारावे लागते. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता व शारीरिक सुदृढतेसाठी सायकलचा वापर करणे काळाची गरज असल्याचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला.

या सायकल रॅलीत शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुप कोहळे, गौरव कोल्हटवार, अमित नस्कुलवार, मार्शल उराडे, धनराज कोवे, मुन्ना नस्कुलवार, पियुष ठाकरे, संकेत समर्थ, प्रणय मेश्राम, प्रवीण कांबळे, शुभम गुजरकर, चेतन ठाकरे, करण कोलते, टारझन बुटकावार, प्रथमेश आरेवार, धर्मेंद्र गोटेवार, विवेक कोरेवार, आर्यन मडावी, गौरव मादेश्वर, ओमकार बलमवार यांच्यासह मोठ्या संख्येने कोटगल येथील युवक सहभागी झाले होते.