विवाहित लेकीच्या भेटीसाठी ते निघाले, काळ बनून आलेल्या ट्रकने चिरडले

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुरखेडा : विवाहित लेकीला भेटण्यासाठी तिच्या सासरी दुचाकीने निघालेल्या पित्याचा वाटेतच अपघाती मृत्यू होण्याची घटना कुरखेडा ते नागपूर मार्गावर घडली. यशवंत नामदेव गहाणे (58 वर्ष,रा.अंगारा, ता.कुरखेडा) असे मृत पित्याचे नाव आहे.

गहाणे हे लेकीच्या गावी ताडगाव येथे तिला भेटण्यासाठी दुचाकीने जात होते. रिकाम्या हाताने न जाता लेकीसाठी आपल्या शेतातील भाजीपाल्याने भरलेली पिशवी त्यांनी घेतली होती. पण मार्गात ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुरखेडा पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला, पण चालक या घटनेनंतर पसार झाला.