आमगावच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभागृहासह रस्त्यांच्या कामांना सुरूवात

आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन

आरमोरी : आरमोरी मतदार संघातील आमगाव येथे 25-15 योजनेतील निधीअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामासह लालाजी उईनवार ते नानाजी बघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटिंग रस्त्याचे बांधकाम, भालचंद्र ढोरे यांच्या घरापासून सिमेंट नालीचे बांधकाम अशा विविध कामांचा समावेश आहे.

या भूमिपूजनाला गावच्या सरपंच रुपला बोदेले, उपसरपंच प्रभाकर चौधरी, ग्रा.पं. सदस्य व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष योगेश नाकतोडे, ग्रा.पं.सदस्य राजेश कोल्हे, श्रीराम भोयर, सुरेखा ढोरे, माधव ढोरे, नारायण ढोरे, अनिल नवघडे, भाऊ घोरमडे, विलास पोट्वार, लालाजी अलोने, कुंदन बुराडे, चेतन सहारे, पवन निकम, बबन मिसार, विनोद नवघडे, मयूर ढोरे व गावातील नागरिक उपस्थित होते.