गोमनी ग्रामपंचायतअंतर्गत गावांचा होणार कायापालट, विविध कामांना सुरूवात

भाग्यश्री आत्राम यांनी केले भूमिपूजन

मुलचेरा : तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट विविध गावांत विकासात्मक कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

गोमनी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निधी दिला. भाग्यश्री आत्राम मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना येथील विविध गावांत जाऊन सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकामाचे भूमिपूजन त्यांनी केले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी उपसरपंच साईनाथ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युधिष्ठिर बिश्वास, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, विवेकानंदपूरच्या सरपंच भावना मिस्त्री, गोमनी ग्रामपंचायतचे सदस्य शुभम शेंडे, अजय विरमलवार, सुंदरनगर ग्रामपंचायत सदस्य रंजित स्वर्णकार, निखिल इज्जतदार, बबलू शील, विष्णू रॉय आदी उपस्थित होते.