Home दैनंदिन बातम्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून चांगल्या विचारांचा स्विकार करावा- खारोडे

धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून चांगल्या विचारांचा स्विकार करावा- खारोडे

घोटमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

चामोर्शी : धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी हा महत्वाचा दिवस आहे, तेव्हा प्रत्येकाने या दिवसापासून चांगल्या विचारांचा स्विकार करावा व वाईट मार्गाचा त्याग करावा. यातूनच आपल्या जीवनात सुख-शांती प्राप्त होऊ शकते, असे मोलाचे मार्गदर्शन सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश खारोडे यांनी घोट येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती घोटच्या वतीने आंबेडकर चौकात 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय हरिदास पवार, सरपंच रूपाली दुधबावरे, दशरथ साखरे, बौद्ध समाज घोट सर्कलचे अध्यक्ष विशाल दहिवले, समितीचे उपाध्यक्ष गोकुळदास वाकडे, माजी सरपंच रामटेके, नामदेव फुलझेले आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर, हरिदास पवार, सरपंच रूपाली दुधबावरे, विशाल दहिवले यांनी बौद्ध धम्माप्रती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन दिलीप खोब्रागडे, प्रास्ताविक खुशाल खोब्रागडे तर आभार प्राजक्ता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमास घोट सर्कलचे बौद्ध बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.