निवडणूक खर्च निरीक्षक दाखल, विधानसभानिहाय केली पाहणी

नागरिकांच्या तक्रारीही जाणून घेणार

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात निवडणूक खर्च निरिक्षक एस.वेणुगोपाल दाखल झाले आहेत. त्यांनी आरमोरी, गडचिरोली, चिमूर व ब्रम्हपुरी या विधानसभा मतदार संघांमध्ये भेट देऊन निवडणूकविषयक कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली. संबंधीत सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांनी निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

सर्वसामान्य मतदार, निवडणूक लढणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्चाविषयीच्या तक्रारी एस.वेणुगोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर किंवा निवडणूक विभागाच्या सी-व्हिजिल या मोबाईल ॲपवर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.