अहेरी : भाग्यश्रीताई आत्राम फॅन्स क्लबतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ५१ जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नववधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
राजाराम (खां) येथे झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात परिसरातील छलेवाडा, सुर्यापल्ली, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी, मरनेला, पत्तीगाव, खांदला, कोत्तागुडम आणि राजाराम यासह इतर गावातील तब्बल 51 इच्छुक जोडप्यांचा थाटामाटात विवाह लावण्यात आला. या जोडप्यांना विवाहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या सोहळ्यास मोठ्या संख्येने वऱ्हाड्यांसह वधू-वरांचे नातलग उपस्थित होते.
दरम्यान गावातून भव्य मिरवणूक काढत मंगलाष्टके म्हणत वधू-वरांचे नातलग व उपस्थित नागरिकांनी या जोडप्यांवर पुष्प वर्षाव करून शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यानंतर सर्वांनी ठेका धरला. अत्यंत मंगलमय वातावरणात हा सोहळा झाला. अनेक गरीब कुटुंबांना हा विवाह सोहळा मोलाचा आधार ठरल्याचे दिसून आले.
या सामूहिक विवाह सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते रामेश्वरबाबा आत्राम, माजी जि. प. सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत, लक्षण येरावार, श्रीनिवास विरगोनवार, किशोर करमे, सारिका गडपल्लीवार, राजारामच्या सरपंच मंगला आत्राम, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मेडपल्लीचे सरपंच निलेश वेलादी, रेपनपल्लीचे उपसरपंच विलास नेरला, बालाजी गावडे, सांबय्या, अहेरी तालुकाध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य स्वप्नील श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, अनुराग बेझलवार, सुमित मोतकुरवार, ग्रा.पं. सदस्य सालय्या कंबालवार, लक्ष्मी सिडाम, माया सुनतकर, ज्योती ठाकरे, महेश बाकीवार, राजाराम येथील ग्रा.पं. सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.