प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सुरजमल चव्हाण आश्रमशाळेचा उपक्रम

चामोर्शी : तालुक्यातील रेखेगावच्या स्व.सुरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, तसेच स्व.सुधाकरराव नाईक वि.जा.भ.ज. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावी कला व विज्ञान शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गोवर्धन चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश गणवीर, प्राचार्य उत्तम ढोके उपस्थित होते. याप्रसंगी शशांक जगदीश गणवीर, मीरा मोहनसिंग निस्ते, अथर्व सुधाकर गव्हारे, शितल आंदुलाल निस्ते, पुनम मधुकर जेंगठे, सुमीत संजय कस्तुरे, तनिषा नालसिंग घोती ह्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर समाधान न मानता यापेक्षाही उज्ज्वल यश मिळवावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन किशोर वावरे यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.