गडचिरोली : जेएनसीटी प्रोफेशनल युनिव्हर्सिटी भोपाळ यांच्याद्वारा आयोजित चार दिवसीय ए.आई.यु. विभागीय वुडबॉल स्पर्धेचे गोंडवाना विद्यापीठाच्या महिला आणि पुरूष संघांनी सहभागी होऊन विविध पदके पटकाविली. भारतातील 35 विद्यापीठातील 550 महिला व पुरुष खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
![](https://kataksh.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250114-WA0051.jpg)
या स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडूंनी फेअरवे टिम इव्हेंट (महिला) गटात कांस्यपदक तर स्ट्रोक डबल इव्हेंट (पुरुष) गटात रजतपदक, फेअरवे टिम इव्हेंट (पुरुष) गटामध्ये कांस्यपदक पटकाविले. सदर संघांसोबत व्यवस्थापक म्हणून डॉ.संघपाल नारनवरे, प्रशिक्षक शाहरुख शेख होते.
या स्पर्धेकरीता खेळाडूंना क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ.अनिता लोखंडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी खेळाडूंचे कौतूक केले.