देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा, मोहटोला, जुनी अरततोंडी या गावांना गाढवी नदीला आलेल्या पुरामुळे फटका बसला. तेथील परिस्थितीची पाहणी मंगळवारी आमदार कृष्णा गजबे यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना दूरध्वनीद्वारे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
गाढवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या किन्हाळा/मोहटोला, जुनी अरततोंडी तसेच जवळच्या गावांना याचा मोठा फटका बसला आहे. पूरस्थितीची पाहणी करताना आ.गजबे यांच्यासोब देसाईगंजचे पोलीस निरीक्षक जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिरालाल शेंडे, योगेश राऊत, भोपाल दरवे, घनश्याम राऊत तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.