राणी दुर्गावती कन्या विद्यालयात बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत येथील राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने 94.91 टक्के निकाल देऊन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. निकालानंतर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकवृंदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामान्य घरातील मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा अशी या शाळेची प्रतिमा झाली आहे.

या शाळेची प्रज्ञा देवेंद्र फुलझेले या विद्यार्थिनीने 77.33 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. चांदणी दिगांबर मडावी ही 76.83 टक्के गुणांसह द्वितीय, तर छकुली विनाजी मेश्राम ही 74.33 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. याशिवाय गौरी कविंद्र म्हस्के हिला 73.07 टक्के तर महिमा काशिनाथ चौधरी हिला 71.67 टक्के गुण मिळाले. यावर्षी कला कनिष्ठ महाविद्यालयातून प्राविण्य श्रेणीत 2, प्रथम श्रेणीत 11, द्वितीय श्रेणीत 34, तृतीय श्रेणीत 9 विद्यार्थिनी पास झाल्या आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आदिवासी सेवक घनश्याम मडावी, पदाधिकारी सरोज मडावी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वैशाली मडावी, प्रा.देवानंद कामडी, प्रा.संध्या येलेकर, सुनिता चुधरी, सोनाली लटये, धनराज ठेमस्कर, आनंदराव मांडवगडे, दिवाकर जल्लेवार, सतीश मडावी तथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सत्कार व अभिनंदन केले.