गडचिरोली : जैन कलार समाज गडचिरोलीच्या पुढाकाराने शहरातील जैन कलार समाजाचा स्नेहमिलन सोहळा व कोजागिरी कार्यक्रम मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी चामोर्शी मार्गावरील कात्रटवार सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजहिताच्या विषयांवर, समाजाच्या प्रगतीसाठी विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा जैन कलार समाज न्यासचे अध्यक्ष रतन शेंडे, तर उद्घाटक म्हणून मध्यवर्ती कार्यकारिणीचे संचालक भूषण समर्थ, तर अतिथी म्हणून जैन कलार समाज बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप रणदिवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम दिवंगत कुसुम रणदिवे व ज्योती मोरघरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नवागत समाज बांधवांचा परिचय करून घेण्यात आला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक लीला भिवापुरे, विजया समर्थ, मंजुळा रणदिवे, यशोदा हरडे, पुष्पा भिवापुरे, पुष्पा कवठे, कमल वैरागडे, नलिनी लांजेकर, जिजा समर्थ, कमल दडवे, सतीश आदमने, भानुदास डोर्लीकर, परशुराम समर्थ, भूषण समर्थ, कमल हजारे, लिला दहीकर तसेच सेवानिवृत्त कर्मचारी ज्योती मुरकुटे, शिल्पा आदमने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थी यश भांडारकर, नंदिनी दडवे यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक, उत्साहवर्धक व स्नेहपूर्ण वातावरणात समाजबांधवांनी स्नेहभोजन व रात्री कोजागिरीचा आनंद घेतला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना रतन शेंडे म्हणाले, आजच्या काळात समाज एकसंघ राहणे खूपच महत्त्वाचे आहे. कलार समाजामध्ये गुणवंतांची कमतरता नाही. मात्र समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन मागे पडलेल्या घटकाला पुढे नेणे गरजेचे आहे. यासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली मुरकुटे यांनी तर संचालन जिल्हा जैन कलार समाज न्यासचे सचिव पांडुरंग पेशने यांनी केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लाड, तर आभार बचत गटाचे सचिव मनोज कवठे यांनी मानले. या कार्यक्रमात नितीन डवले, प्रदीप लाड, हेमंत डोर्लीकर, डॉ.उमेश समर्थ, सुधीर शेंडे, ॲड.अरुण रणदिवे , राजेंद्र लांजेकर, महेश मुरकुटे, राजू घुगरे. किशोर भांडारकर, कविश्वर बनपूरकर, सुरेश वैरागडे, सुनील हजारे, प्रमोद शेंडे, स्वाती कवठे, भाग्यश्री शेंडे, सुरेखा रणदिवे , अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना मानापुरे, अर्चना भांडारकर, कल्पना लाड, डॉ.पियुषा समर्थ , रीना दडवे, लता मुरकुटे, विराग रणदिवे, घनश्याम हट्टेवार, मंगेश खेडीकर, प्रदीप खेडीकर, दिलीप आष्टेकर, राजेंद्र खानोरकर, गणेश हरडे, श्रीधर कवठे, तुकाराम तिडके आदींसह जैन कलार समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.