कोहळी समाजाचा 21 जानेवारीला होणार सेमाना देवस्थानात स्नेहमिलन मेळावा

समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली : स्थानिक कोहळी समाज संघटना शाखा गडचिरोलीतर्फे शहर व परिसरातील कोहळी समाज बांधव व महिलांचा स्नेहमिलन मेळावा रविवार 21 जानेवारी रोजी होणार आहे. चामोर्शी मार्गावरील सेमाना देवस्थानात दुपारी 1 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाजी पाटील संग्रामे राहणार असून उद्घाटक म्हणून पद्मश्री डॅा.परशुराम खुणे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे, डॉ.आशिष खुणे, डॉ. मनिष पर्वते, डॅा.स्नेहा नाकाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मागील जमाखर्च, स्त्रियांकरिता सामूहिक हळदी-कुंकू, सत्कार समारंभ, समाजाच्या विकासाबद्दल चर्चा, मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ असे विविध कार्यक्रम होणार आहेत. परिसरातील सर्व कोहळी बांधवांनी सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष खुशालराव मस्के यांनी केले आहे.