खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत मुरखळ्यात विविध आजारांची तपासणी

'मन की बात' कार्यक्रमालाही हजेरी

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १०५ व्या भागाचे थेट प्रक्षेपण रविवारी नवेगांव (मुरखळा) येथील ग्रामपंचायत प्रभागातील बुथ क्रमांक १३० व १३१ वर आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन नवेगाव येथे केले होते.

देशात सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी आणि प्रेरणादायी गोष्टी मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी पटलावर आणतात. त्यामुळे अनेक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मुरखळा येथे घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन खा.अशोक नेते यांनी स्वतःची शुगर बीपी तपासणी करून केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूकडून तोंडाच्या, स्तनाच्या, गर्भाशयाच्या, मुखाच्या, कर्करोगाची पूर्वतपासणी, बीपी, शुगर अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रदेश सरचिटणीस (एसटी मोर्चा) प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते रमेश भुरसे, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, उपसरपंच राजू खंगार, युवा मोर्चाचे महामंत्री अनिल तिडके, युवा मोर्चाचे कीर्तीकुमार मासुरकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, हर्षित सहारे, निखिल सुंदरकर, निखिल चरडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.