ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार गडचिरोलीत शासकीय ध्वजारोहण

20 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांना उपस्थिती

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवार दि.१५ ला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून यावेळी ना.धर्मरावबाबा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सत्कारही केला जाणार आहे.

ना.आत्राम दि.20 पर्यंत जिल्ह्यात आहेत. ते दि.16 ऑगस्ट रोजी सकाळी गडचिरोली येथून आरमोरीला जातील. तेथील कार्यक्रम आटोपून गडचिरोली निवासस्थानी मुक्काम करतील. दि.17 ला सकाळी सिरोंचाकडे प्रयाण करून दुपारी नगरपंचायत सिरोंचा येथील सभागृहात सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. दुपारी सिरोंचा येथून मोटारीने अहेरीकडे प्रयाण किंवा सिरोंचा येथील स्नेहधर्म या निवासस्थानी मुक्काम राहील. दि.18 रोजी दुपारी अहेरी निवासस्थान येथून आलापल्लीला जाऊन वनसंपदा ईमारत, उपवनसंरक्षक कार्यालय येथे सर्व विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर अहेरी निवासस्थान मुक्काम करतील. दि.19 रोजी एटापल्ली येथे क्रीडा संकुलाचे उद्घाटन करून मुलचेराकडे प्रयाण करतील. तेथून गडचिरोलीला येऊन मुक्काम करतील. दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी ना.आत्राम गडचिरोली निवासस्थान येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.