अपघाती मृत्यू ओढवलेल्या इसमाच्या कुटुबियांचे खा.नेते यांच्याकडून सांत्वन

घरी भेट देऊन केली आर्थिक मदत

कुटुंबियांचे सांत्वन करताना खा.अशोक नेते, सोबत भाजप पदाधिकारी.

आरमोरी : तालुक्यातील मौजा ठाणेगांव येथील सुरेश दुधराम लठ्ठे (५० वर्ष) हे शेतात उन्हाळी धानासाठी ट्रॅक्टरने चिखलणी करित असताना ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी ठाणेगाव येथे लठ्ठे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्वत:कडून कुटुंबियांना आर्थिक मदतसुद्धा दिली.

याप्रसंगी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, आयटी सेलचे प्रमुख ओमकार मडावी, युवा नेते विकास पायडलवार, बुथ प्रमुख अनिल नैताम, सरपंच वासुदेव मंडलवार, सुरेश जुवारे, घनश्याम कुनघाटकर, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.