खा.अशोक नेते यांच्यासह जिल्हाधिकारी मीना व पदाधिकाऱ्यांनी गोळा केला कचरा

गडचिरोलीत स्वच्छतेचा जागर, पहा व्हिडीओ

गडचिरोली : गडचिरोली शहरात रविवारी भारतीय जनता पक्षासह जिल्हा व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान आणि ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात आला. शहराच्या इंदिरा गांधी चौकासह बस स्थानक, कॅाम्प्लेक्स भागातही हे अभियान राबविण्यात आले. खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीना, आ.डॅा.देवराव होळी, न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, तसेच अनेक अधिकारी व पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि.१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता-सेवा पंधरवाडा’अंतर्गत दररोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी स्वच्छता अभियान राबवून शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी चौकातील ररस्त्यांसह लगतच्या अस्वच्छ परिसराची स्वच्छता करण्यात आली. “माझी माती, माझा देश” या उपक्रमांतर्गत सजविलेल्या वाहनात मातीचे कलश ठेवून निघालेल्या अमृत कलश यात्रेत आठवडी बाजार येथील हनुमान मंदिर, राम मंदिर व साई मंदिरातून पवित्र माती संकलित करण्यात आली. तसेच शहरातील घरा-घरातून पवित्र माती कलशामध्ये संकलित करण्यात आली.

या उपक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपमुख्याधिकारी रवींद्र भांडारवार, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, शहर महामंत्री केशव निंबोळ, विनोद देवोजवार, विवेक बैस, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर, हर्षल गेडाम, आशिष रोहनकर, अरुण हरडे, दीपक सातपुते, संजय बारापात्रे, मंगेश रणदिवे, अनिल कुनघाडकर, जनार्धन साखरे, विलास नैताम यांच्यासह विविध बँकांचे कर्मचारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी तथा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

न.प.च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

गडचिरोली न.प.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक सूर्यकांत पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात न.प.चे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता सुजित खामणकर, वैभव कागदेलवार यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीने शहरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगर पालिकेतर्फे त्यांना ग्लोव्हज, मास्क, झाडू, टी-शर्ट आदी साहित्य देण्यात आले होते. सदर उपक्रमात नगर परिषदेचे उत्कृष्ट कार्य करणारे सफाई कामगार निळकंठ भरडकर, बादल मुनघाटे, राजू कोरचा, सुभाष मेश्राम, विलास वाढई, शोभा शिलेदार, सारिका तांबेकर, कमला मोगरे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.