एटापल्ली : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात तालुक्यातील विविध विभागांच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांची आढावा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध महत्वपूर्ण विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून आढावा घेतला आणि मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना करत त्यांनी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विकासात्मक कामात हयगय खपवून घेणार नाही, अशी तंबी दिली.
याप्रसंगी कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, पोलीस विभाग, एस.टी महामंडळ, महसुल विभाग, पाणी पुरवठा, सिंचन विभाग अशा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला.
बैठकीला प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी वाघमारे, तहसीलदार भांडेकर, प्रकल्प अधिकारी श्रीमती चव्हान, ठाणेदार कुकडे, विस्तार अधिकारी गव्हाने, एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष निखील गादेवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, जिल्हा सचिव बाबुराव गंफावार, विजय नल्लावार, अशोक पुल्लुरवार, प्रसाद पुल्लुरवार, प्रसाद दासरवार, संपत पैदाकुलवार, प्रशांत मंडल, मनोज मुजुमदार व इतर सर्व विभागाचे अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.