चामोर्शी बस स्थानकाच्या बांधकामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हर्च्युअल भूमिपूजन

सामान्य जनतेच्या सुरक्षित प्रवासासाठी लालपरीची सेवा- खा.नेते

चामोर्शी ः राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाअंतर्गत चामोर्शी बसस्थानक बांधकामाचे व्हर्च्युअल भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कुदळ मारुन या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आ.डॅा.देवराव होळी यांच्यासह विभाग नियंत्रक स्मिता सुतवने, नायब तहसीलदार वैद्य, एसटीचे अभियंता मोडक , प्रकाश गेडाम, स्वप्निल वरघंटे, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, माजी जि.प.सभापती रमेश बारसागडे, दिलीप चलाख, विनोद गौरकर, साईनाथ बुरांडे, भास्कर बुरे, शेषराव कोहळे, जयराम चलाख आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार नेते म्हणाले, सामान्य नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाची लालपरी आपल्या सेवेत तत्पर राहिल. यावेळी त्यांनी तालुक्याच्या विकासात्मक कामांचे विविध मुद्दे सांगितले. गडचिरोली विधानसभेचे आमदार असताना केलेल्या अनेक महत्वाच्या विकासात्मक मुद्द्यांवरही त्यांनी लक्ष वेधले.