गडचिरोली जिल्ह्याला मिळाले नऊ नवीन उपविभागीय पोलिस अधिकारी

कुठे कोण एसडीपीओ येणार, वाचा

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सेवाकाळ पूर्ण करणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली असून नऊ ठिकाणी नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सरळ सेवा प्रविष्ठ नवीन दमाच्या २७ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा आदेश निघाला आहे. त्यातील ९ जण गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत.

नवीन एसडीपीओ आणि त्यांचे रुजू होण्याचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे.
संदेश तारसिंग नाईक (एसडीपीओ, सिरोंचा), चैतन्य वसंतराव कदम (एसडीपीओ, एटापल्ली), रविंद्र भोसले (एसडीपीओ, कुरखेडा), विशाल अर्जुन नागरगोजे (पोलिस उपअधीक्षक, अभियान गडचिरोली), अमर मानसिंग मोहिते (एसडीपीओ, भामरागड), सुरज विठ्ठल जगताप (एसडीपीओ, गडचिरोली), अजय विलासराव कोकाटे (एसडीपीओ, जिमलगट्टा), शिरीष बाबासाहेब माने (एसडीपीओ, धानोरा) आणि योगेश चंद्रकांत रांजणकर (एसडीपीओ, हेडरी).