राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, शस्रपुजेसह शहरातून पथसंचलन

स्वयंसेवकांची स्वसंरक्षणार्थ प्रात्यक्षिके, पहा व्हिडीओ

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्रपुजा उत्सव आरमोरी मार्गावरील तुळजाई प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडला. यानिमित्त स्वयंसेवकांनी शहरातून पथसंचलन केले. यात आ.डॅा.देवराव होळी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

पथसंचलनाने पुन्हा तुळजाई शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर स्वयंसेवकांनी लाठ्याकाठ्यांसह विविध प्रात्याक्षिके सादर केली. याशिवाय कोणत्याही शस्राविना स्वसंरक्षण कसे करायचे याचीही प्रात्याक्षिके सादर केली. ज्येष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह रा.स्व.संघाचे विदर्भ प्रांत बौद्धिक प्रमुख उल्हास ईटनकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला स्वयंसेवकांसह शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.