धानोरा तालुक्यातील चिंगली गावातही छोटेखानी वाचनालयाला सुरूवात

एक गाव, एक वाचनालयाचा पोलिसांचा संकल्प

धानोरा : पोलिसांच्या दादालोरा खिडकी या उपक्रमांतर्गत ‘एक गाव, एक वाचनालय’ सुरू करण्याचा संकल्प पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत धानोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिंगली या गावी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आणि एसडीपीओ साहिल झरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहीद केशव मनुजी उसेंडी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी एसडीपीओ झरकर यांच्यासह धानोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करून वाचनालयाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमाला धानोरा पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि गावातील अनेक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.