शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा समिती जाहीर

रामदास जराते जिल्हा चिटणीस, तर श्यामसुंदर उराडे दुसऱ्यांदा खजिनदार

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाची गडचिरोली जिल्हा समिती नव्याने जाहीर करण्यात आली. यात जिल्हा चिटणीस पदावर रामदास जराते तर जिल्हा खजिनदार म्हणून श्यामसुंदर उराडे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.

येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे यांनी नवीन जिल्हा समिती जाहीर केली आहे.

शेकापच्या या नव्या जिल्हा समितीमध्ये बोरी (चामोर्शी)चे माजी सरपंच संजय दुधबळे, नागरवाही (आरमोरी)चे रोहिदास कुमरे यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून वर्णी लागली आहे. तसेच दामोदर रोहनकर, फराडा (चामोर्शी), श्रीकृष्ण नैताम (चामोर्शी), डॉ.गुरुदास सेमस्कर (गडचिरोली), पांडुरंग गव्हारे, कुनघाडा (चामोर्शी), उपसरपंच तुळशीदास भैसारे, मेंढा (गडचिरोली), ग्रा.पं.सदस्य तुकाराम गेडाम, पुलखल (गडचिरोली), गंगाधर बोमनवार, मोहुर्ली (चामोर्शी) यांची शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व परिषदेच्या वतीने जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्यांमध्ये सुधाकर आभारे, मरेगाव (गडचिरोली), रमेश चौखुंडे, सगणापूर (चामोर्शी), अशोक किरंगे, नागरवाही (आरमोरी), बाजीराव आत्राम, पंदेवाही (एटापल्ली), वसंत लोहाट, जांभळी (धानोरा), प्रविण दुर्गे (अहेरी) यांना संधी देण्यात आली आहे. तर तितिक्षा डोईजड यांना महिला प्रतिनिधी आणि भाई अक्षय कोसनकर यांची युवक प्रतिनिधी म्हणून जिल्हा समितीवर वर्णी लागली आहे.

सदर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, महिला राज्याध्यक्ष आशाताई शिंदे, युवक आघाडीचे राज्याध्यक्ष बाबासाहेब देशमुख, आमदार शामसुंदर शिंदे, मध्यवर्ती चिटणीस मंडळाचे सदस्य माजी आमदार संपतबापू पवार पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रा.एस.व्ही. जाधव, बाबासाहेब कारंडे, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, चंद्रकांत चव्हाण, चित्रलेखा पाटील, जयश्री वेळदा, सरपंच दर्शना भोपये, सरपंच सावित्री गेडाम यांचेसह जिल्हा शेकाप परिषद आणि गाव शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.