ईव्हीएमसाठी तैनात झाले सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांचे जवान

कशी आहे त्रिस्तरीय सुरक्षा, पहा झलक

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर गडचिरोली-चिमूर मतदार संघाअंतर्गत गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांमधील ईव्हीएम (मतदान यंत्र) गडचिरोलीत आणण्यात आले आहेत. देशभरात एकाच दिवशी 4 जूनला मतमोजणी होणार असल्यामुळे या ईव्हीएम त्रिस्तरीय कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत.

येथील कृषी महाविद्यालयाला स्ट्राँग रूमध्ये रूपांतरित करून त्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलिस दल, राज्य राखीव पोलिस दल आणि जिल्हा पोलिस दलाच्या जवानांचा 24 तास पहारा राहणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.