वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना दिली आर्थिक मदत

आ.कृष्णा गजबे यांच्याकडून सांत्वनपर भेट

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील ठुशी येथील रहिवासी सायत्रा अंताराम बोगा यांच्यावर दि.२१ च्या सकाळी वाघाने हल्ला केला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आघातातून सावरण्यासाठी बोगा कुटुंबियांची आमदार कृष्णा गजबे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना आर्थिक मदतही केली. त्यांना शासनाकडूनही लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबलू हुसैनी, कुरखेडा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, कुरखेडा ग्रामीण तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, सरपंच रेमाजी किरणापुरे व ठुशी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.