येथे रिकाम्या टेबल-खुर्च्यांसाठी चालतात पंखे आणि लाईट

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात विजेचा अपव्यय

गडचिरोली : विजेचा अपव्यय आणि बिलाचा भुर्दंड कमी करण्यासाठी आपल्या घरात आवश्यकता असते तेव्हाच पंखे, लाईट किंवा एसीचा वापर आपण करतो. पण स्वतःच्या घरी विजेची काटकसर करणारे अधिकारी-कर्मचारी सरकारी कार्यालयात जातात त्यावेळी मात्र विजेच्या वापराबद्दल बिनधास्त असतात. विजेचा अपव्यय होईल का याची चिंता कोणालाच नसते. जणूकाही सरकारी कार्यालयातील विजेचे बिलच येत नाही, अशा अविर्भावात तेथील पंखे रिकाम्या टेबल-खुर्च्यांना हवा घालत असतात. याचा प्रत्यय येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात आला.