कुरखेडा : रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा आरमोरी तालुक्यातून कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला आहे. कढोली परिसरातील भगवानपूरच्या जंगलात त्यांचे अस्तित्व दिसून आले आहे. तलाव परिसरात हत्तींचे प्रत्यक्ष दर्शनही काही जणांना झाले. या हत्तींच्या हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना जागरूक करण्यासाठी हुल्ला टिमसह वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहे.
सध्या तेंदूपाने तोडाईचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यातच तलाव परिसरात हत्ती दिसल्याने नागरिकांमध्ये घबराहट सुटली आहे. तेंदूपाने तोडाई करणाऱ्यांनी या हत्तींपासून दूर राहावे, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.