राज्याच्या पूर्व टोकावरील मातीचा अमृत कलश पोहोचवला पश्चिम टोकावर

खा.नेते यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द

गडचिरोली : संपूर्ण देशपातळीवर ‘मिट्टी को सलाम, विरों को वंदन, मेरी माटी मेरा देश’ अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण देशाला एकत्र जोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याअंतर्गत राज्याच्या पूर्व टोकावरील गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रांतर्गत देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील घराघरातून गोळा करण्यात आलेल्या मातीचा अमृत कलश खा.अशोक नेते यांच्या नेतृत्वात राज्याच्या पश्चिम टोकावर राजधानी मुंबई येथे पोहोचवून तो प्रदेश भाजप कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या मातीचे अमृत कलश एकत्र केले जात आहेत. राज्याच्या पूर्व टोकावरील अमृत कलश प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांना सुपूर्द करताना खा.अशोक नेते यांच्यासह कार्यालयीन मंत्री भरत राऊत, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, देवरी विधानसभा प्रमुख व माजी आ.संजय पुराम, कृउबा समिती देवरीचे सभापती प्रमोद संगिडवार, देवरी तालुकाध्यक्ष अनिल येरणे, देवरीचे नगराध्यक्ष संजय ऊईके, उपसभापती अनिल बिसेन, सालेकसाचे महामंत्री राजेंद्र बडोले यांच्यासह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.