देसाईगंजमध्ये भाजपचा बुथ पालक मेळावा, खासदार-आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

नऊ वर्षातील कामे लोकांपर्यंत पोहोचवा-खा.नेते

देसाईगंज : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बुथ पालक मेळावा सोमवारी (दि.११) येथील सिंधू भवनात आयोजित केला होता. महाविजय २०२४ चा संकल्प करत मोदी सरकारच्या कार्यकाळातील कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार अशोक नेते यांनी केले.

यावेळी मंचावर आ.कृष्णा गजबे, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष बबलू हुसैनी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष राजू जेठानी प्रामुख्याने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबरला असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपण सुद्धा हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे, असे आवाहन यावेळी खासदार नेते यांनी केले.

यावेळी देसाईगंज येथे घराघरांमध्ये घर चलो अभियानांतर्गत जनसंपर्क करून माहिती पत्रकांचे वाटप खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.