‘महाविजय-2024’साठी बुथ पालकांची जबाबदारी महत्वाची- खासदार नेते

सेवा पंधरवाडा उपक्रम राबवण्याची सूचना

गडचिरोली : भाजपच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बुथ पालकांचा मेळावा रविवारी येथील प्रेस क्लब भवनात घेण्यात आला. यावेळी महाविजय -2024 साठी बुध पालकांची जबाबदारी महत्वाची असून मोदी @ 9 हे महाजनसंपर्क अभियान राबविताना पक्षाने दिलेले अॅप डाऊनलोड करून सेवा पंधरवाडा उपक्रम राबवण्याची सूचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी केली.

यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक तथा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, महिला मोर्चाच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आदी उपस्थित होते.

या मेळाव्याला खासदार ‌नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच बुथ पालकांनी घर चलो अभियान, मेरी माटी मेरा देश याअंतर्गत प्रत्येक घराघरांमध्ये पत्रक व केलेले कार्य पोहोचवण्याचे, मोदी ॲप व सरल ॲप ऍक्टिव्ह करण्याचे आवाहन केले. तसेच सेवा पंधरवडा प्रत्येक बुथवर राबवण्याचे आवाहन केले.

येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपण सुद्धा हा उपक्रम संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे, अशी सूचना याप्रसंगी खासदार नेते यांनी केली.

यावेळी घर चलो अभियान जनसंपर्काचे पत्रक खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.