खा.अशोक नेते उतरले कोकणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात

केंद्रीय मंत्री राणे यांच्या निवासस्थानी चर्चा

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोकणच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या लोकसभा प्रचारार्थ कणकवली विधानसभेत असताना बुधवार, दिनांक १ मे २०२४ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे हेसुद्धा उपस्थित होते.

मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सरकारबद्दल विश्वास वाढला असून हा विश्वासच महायुतीच्या उमेदवारांना विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवेल, असे खा.अशोक नेते यावेळी म्हणाले.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पहा खाली)