बुथ यंत्रणा सक्षमीकरणातून निवडणूक जिंकणे सोपे, खासदारांचा कानमंत्र

शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांची जबाबदारी महत्वपूर्ण

गडचिरोली : महाविजय २०२३-२४ अभियानांतर्गत बुथ सशक्तिकरणासंदर्भात ब्रह्मपुरी तालुक्यातील
भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या दुर्गा मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते यांनी या अभियानात शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांची जबाबदारी महत्वपूर्ण असून बुथ यंत्रणा सक्षम झाली तर निवडणूक जिंकणे सोपे होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे अभियान गांभिर्याने घेण्याचे आवाहन केले.

भाजपचे बुथ सशक्तीकरण अभियान विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकण्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने गांभीर्याने घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करावे. गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना व समाजोपयोगी उपक्रम घराघरात पोहोचवणे ही बुथप्रमुखांची जबाबदारी आहे, अशी सूचना खासदार नेते यांनी कार्यकर्त्यांना दिली.

या आढाव्या बैठकीत माजी आमदार तथा प्रदेश प्रवक्ते गिरिश व्यास, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले.

बैठकीला प्रामुख्याने भाजपचे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा.कादर शेख, भाजपा ओबिसी मोर्चाचे लोकसभा प्रमुख प्रा.प्रकाश बगमारे, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, प्रा.रामलाल दोनाडकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुद्धे, मनोज भूपाल, मनोज वठ्ठे, स्वप्निल अलगदेवे, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.