गडचिरोली : मी गडचिरोलीत खानावळ चालवत होतो. भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करताना जिल्हाभरातून येणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आपुलकीने जेवणाबद्दल विचारायचो. पुढे पक्षासाठी काम करताना बाहेरगावचे दौरे वाढले. त्यामुळे खानावळीकडे (हॅाटेल) दुर्लक्ष होऊन नंतर ती बंद करावी लागली. पण पक्षासाठी केलेल्या कामाची योग्य दखल घेऊन पक्षाने मला संधी दिली. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर होते. तुम्हीही पक्षाचे काम करत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहा, असे मोलाचे मार्गदर्शन खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जिल्हा बैठक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक येथील विश्रामभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यावेळी प्रामुख्याने आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे, प्रदेश सरचिटणीस (एस.टी. मोर्चा) प्रकाश गेडाम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंधलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खा.नेते म्हणाले, गावतील नागरीकांचे प्रश्न हे तालुकास्तरावरील असतात. श्रावण बाळ निराधार योजना, घरकुल, आरोग्य योजना इत्यादी शासकीय योजनांची माहिती भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नागरीकांना दिली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या सुविधांची माहिती द्यावी. आता नवीन मतदार नोंदणीसोबत आपल्या पक्षाची ध्येयधोरणे समजावुन सांगावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक तथा ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, माजी जिप. सभापती रंजिता कोडापे, भाजपा महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, माजी जि.प. सदस्य लता पुंगाटी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे, जेष्ठ नेत्या वच्छला मुनघाटे, पुष्पा करकाडे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निंबोड, तसेच संजय पंदीलवार, संजय बारापात्रे, वासुदेव बट्टे, गोवर्धन चव्हाण, अविनाश विश्रोजवार, युवाचे मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातपुते, शहर महामंत्री हर्षल गेडाम, ग्रामिण तालुका अध्यक्ष आकाश निकोडे, नगरसेवक विलास पारधी, युवा आशिष कोडापे, शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, शहर कारागीर आघाडीचे नरेश बावणे, देवाजी लाटकर, दत्तू माकोडे, अनिल करपे, सौरभ केदार आदीं अनेक जण उपस्थित होते.
– अन् मी भाजपचा कार्यकर्ता झालो – वाघरे
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी खासदार अशोक नेते आणि ज्येष्ठ नेते रमेश भुरसे यांनी आपल्याला भाजपमध्ये कसे आणले याचा किस्सा यावेळी सांगितला. युवा मोर्चापासून आतापर्यंत पक्षासाठी काम करताना माझ्या कार्याची दखल घेऊन पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी मनापासून स्वीकार करतो व पक्ष संघटनेचे काम प्रामाणिकपणे, स्फूर्तीने व पारदर्शकपणे करेल, अशी ग्वाही वाघरे यांनी दिली. स्वतःची क्षमता ओळखून आत्मविश्वासाने व जिद्दीने काम करा, संधीचे सोने करून नवमतदार नोंदणीमध्ये योगदान द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.