सुंदरनगर ग्रामपंचायतअंतर्गत गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार

मुलचेरा : तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायतअंतर्गत भवनीपूर, भगतनगर, श्रीनगर, तरुणनगर, खुदीरामपल्ली, सुंदरनगर आदी गावांचा समावेश आहे. या गावांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निश्चय मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

विविध पाडे आणि वस्त्यात देखील विकास कामांचा धडाका सुरू आहे. सुंदरनगर ग्रामपंचायतअंतर्गत गावांत देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत.

भाग्यश्री आत्राम यांनी मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना या ग्रामपंचायतअंतर्गत गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. यावेळी माजी जि.प. सभापती युधिष्ठिर बिस्वास, माजी जि.प. सदस्य रवींद्र शहा, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, विवेकानंदपूरच्या सरपंच भावना मिस्त्री, ग्रामपंचायत सदस्य निखिल इज्जतदार, रंजित स्वर्णकार, मनोज कर्मकार, अपूर्व मुजुमदार, विद्युत मंडळ, सपन विश्वास, सुभाष पटेल, तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.