ना.धर्मरावबाबा आत्राम तीन दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम शुक्रवारी (दि.26) सायंकाळी 4 वाजता गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते गडचिरोलीत कृषी महोत्सवाला भेट देऊन अहेरीकडे रवाना होतील.

शनिवार, दि.27 रोजी सकाळी 10.30 वाजता अहेरी निवासस्थान येथून वेलगूरला पोहोचून रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी 11.15 वाजता नवेगाव –किष्टापूर येथे भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12 ते 1 दरम्यान शासकीय विश्रामगृह, आलापल्ली येथे त्यांचा वेळ राखीव राहील. त्यानंतर अहेरी तालुक्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

रविवारी सकाळी 8.30 वाजता राजवाडा अहेरी येथून जिमलगट्टामार्गे दोडगिरकडे मोटारीने प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता दोडगिर येथे रस्त्याच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर सिंधा येथे रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता जिमलगट्टा येथे जिमलगट्टा ते देसलीपट्टा रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी 1.15 वाजता उमानुर येथे ग्रामपंचायत इमारत व पाणी टाकीच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती, तर दु.3 वाजता रोमपल्ली फाटा येथे रोमपल्ली ते झिंगानूर या रस्त्याचे भूमिपूजन, तर सायंकाळी 4 वाजता सिरोंचा येथे नगर पंचायतच्या विकास कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमाला आणि सायंकाळी 5 वाजता उर्स कमिटीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. सोमवारी पहाटे 5 वाजता हैदराबादकडे प्रयाण करतील.